बुधवार 08 मे 2019

रामनवमी- वानर, नर ,नारायण

नारायणाने "नर" अवतार घेतला. वानरांच्या मदतीने "नरा" धमाचा नाश केला, तेव्हाच एक परमभक्त वानर देवत्वाला पोचला. एकाचवेळी एकाचा उद्धार, एकाच विनाश. डार्विन म्हणतो वानरापासून नर होतो. ज्ञानाचा, सत्तेचा अहंकार, वासनायामुळे नराचा नराधम होतो.

त्याला संपवून सृष्टीचा नैतिक समतोल राखण्यासाठी स्वतः नारायण जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा,

 विनाशायदुष्कृताम ....... अवतार घेतो ...आणि ... संभवामीयुगेयुगे...... येतचराहणार. हा अवतार म्हणजे राम.

राम आहे तिथेच आहे. त्याने रावणाला मोक्ष दिला, हनुमानाला प्रेम दिलं, वाल्मिकीला ज्ञान दिलं. त्याच्याकडे कस बघायचं ते तुम्ही ठरवा. मागाल ते द्यायला तो तयार आहे.

नारदांसमोर आपली कुर्हाड परजत आता "मरा "अशी आरोळी ठोकणारा वाल्याकोळी आज आठवतो. मरा मरा याचाच जप कर म्हणजे तुला नवीन अर्थ प्राप्त होईल, तथास्तु ! असाआशीर्वाद नारदमुनी देतात .मरा मरा करणारा वाल्या राम राम करणारा अलौकिक वाल्मिकी ऋषी होतो .आपल्या कर्माकडे दुसर्या दिशेने बघाल तर असामान्य लोक कल्याण कराल असा याचा गर्भित अर्थ. राम तुम्हाला "नवा "मी दाखवेल असा आज रामनवमीला रामाचा संदेश.... !!