मंगळवार 11 डिसेंबर 2018

तीर्थरूप आजी, साष्टांग नमस्कार,

तुमच्या सारख्या अनेक आज्या पेशेंट्स म्हणुन भेटतात. सर्वान्च्या कथा आणि व्यथा सारखयाच असतात. म्हणुन सर्वानाच हे प्रातिनिधिक मानस पत्र!

आजी , सुख देणारा तोच आणि दुक्ख देणाराही तोच.सुख म्हणजे बक्षिस, दुक्ख म्हणजे परीक्षा, शिक्षा नव्हे, तू. जेजे देशील ते ते आनन्दाने स्वीकारते अस त्याला सांगणम्हणजेच अनन्य भक्ति. टिळकानि सुखाची व्याख्याच मुळी दुक्खाशिवायचा काळ अशी केली आहे. सुख म्हणून काही नसतच. एका आन्धळ्याला वाटायच, मला सगळ दिसतायपण सुर्यच काळा प्रकाश देतोय त्याला मी काय करू?. एका बुडबुड्याला वाटायच, कोन्डल की नाही वार्‍याला ? मोठा गमज्या मारत होता. सुख मिळाल, मिळाल म्हणून उड्या मारण म्हणजे वेडेपणाच नाही का?

तुम्ही म्हणता, त्याने( देवाने) तुमच्या देहाचा पिंजरा करून टाकला अनेक व्याधी दिल्या. पण आजी, आतल चैतन्य तर तेच आणि तसच आहे ना सत्तर वर्ष? अमर आणि अजर. तेच खरतर तुम्ही आहात. बाहेरचा पिंजरा म्हणजे तुम्ही नव्हेच. मग त्याला कुठे काय झालय.

देव एकदा एका पोपटाला म्हणाला, काय रे लोखन्डाच्या गन्जलेल्या दांडीवर बसतोस? चाल, सोन्याचा पिंजरा देतो तुला. तो म्हणाला नको रे बाबा, ही गन्जलेली दानडीच बरी आहे आधाराला, केव्हाही सोडता येते. पिंजरा अडकवून ठेवेल, तिथे सोन्याचा काय उपयोग? आठवा, सत्तर वर्षापुर्वी तुम्ही या जगात आलात तेव्हा तुम्ही रडत होतात पण तुम्ही आलात म्हणून सगळे हसत होते. देव ना करो पण आता वेळ आली तर सगळे रडणार आहेत आणि तुम्ही हसत हसत पिंजरा सोडणार आहात.

थोडक्यात, पिंजर्यात जास्त गुंतून पडु नका, चैतन्य जिवंत ठेवा. तेच तुम्ही होतात, आहात आणि राहाणार. ते त्याच आहे, त्याने आणल, त्याच्याकडेच जाणार. पण ते चैतन्य तुम्ही आहत.जे आमच्या डोळ्याला दिसतेय,ई सी जी मध्ये धडधडतेय, रिपोर्ट्स मध्ये ढासळतेय, स्टेथोस्कोप मध्ये हुंकारतेय ते नव्हे, तो श्वास असेल, प्राण नव्हे, हृदय असेल चैतन्य नव्हे,

जाता जाता कबीर आठवला, तो म्हणतो, बघा आयुष्यभर ही बकरी मै मै मै करत होती. आता मेल्यावर तिची लोकर पिन्जतोय तर बघा काय म्हणतेय, तुही तुही तूच तूच!!......

-- आशीर्वाद असु द्या,

तुमचा फॅमिली डॉक्टर.