मंगळवार 11 डिसेंबर 2018

प्रिय सखी,

आज खूप वर्षांनी तुला भेटणार

आपल्या जुन्या आठवणींचा कापूस

हसून हसून ठसका लागेपर्यंत पिंजणार

कित्ती मज्जा केली नै आपण ,

अस दर पाच मिनीटानी म्हणणार

आणि आज अचानक भेटल्यावर

तु माझ्या पोटावर, मी तुझ्या लपवलेल्या

चंदेरी बटांवर कौमेंट करणार

मग मी खुप खुप काही बोलणार

अस वाटत असतानाच,

बहीणाबाईंच्या या ओळी नी

माझ तोंडच बंद केलं

काय बोलणार

माझं सुख, माझं सुखं

हंड्या ,झुंबर टांगलं

माझं दुखं, माझं दुखं

तळघरात कोंडलं

आठवतं? पिकनीकला अंताक्षरी

खेळताना माझ्या वर " ठ"

आणण्याचा तुझा आटापिटा

कौलेजच्या शेवटच्या दिवशी कटींग

चहा पीऊन डोळ्यानीच केलेलं टा टा

मी काय देणार आशिर्वाद

मी फक्त उ कार देऊ शकतो

सखीची होउ दे सुखी

अशी प्रार्थना " त्याला" करु शकतो ।।