बुधवार 10 एप्रिल 2019

लिंबूमिरची

बी पॉज़िटिव हा ब्लड ग्रूप नव्हे तर ती एक व्रुत्ती आहे असं तुमच्याकडे बघून पटतं. तुमच्या संसारात सुद्धा काही कमी अडचणी आल्या नसतील. उलट शिकलेले नवरा बायको म्हणजे जरा जास्तच. कारण काही तडजोडी ते अजिबात करू शकत नाहीत.

पण आताच लग्नातल्या मुन्डावळ्या उतरवून ठेवल्यात असा लग्नाळु गोडवा तुम्ही इतकी वर्ष जपलात. तुमची जोडी मला लिंबू मिरची सारखी वाटते. ( लिंबू कोण मिर्ची कोण ते तुम्हीच ठरवा, न भांडता.)

त्यात लिंबाची ताजगी, फ्रेशनेस आहे. लीरीलच्या एड मधल्या धबधब्या खालच्या मुलीतला उत्साह आहे. वेळ पडली तर रिन पावडर सारखी शंभर लिंबांची शक्ती आहे. लिंबाला मेडिकल बेनिफिट आहे. एंटरटेनमेंट वॅल्यू ( सर्बत ) आहे. जीन च कॉकटेल करण्याच कसब आहे. पाणी ( मित्रमंडळी ) आणि साखर

( समारंभ, पार्टी) एकत्र आले की लिंबू लीज्जत वाढवायला एका पायावर तयार. एवढ सगळ असल तरी त्यात सालिचा कडवट पणा नाही.

मिरचीची गोष्टच वेगळी. इथे तिचा तिखट पणा अभिप्रेत नाही. मिरची मुळेच संसाराला फोडणी मिळते. लज्जत येते. मिरची मुळे लिंबू सगळी सन्कट झेलतं. म्हणून लिंबू मिरची मुळे दृष्ट लागत नाही. मिरचिशिवाय सगळच अळणी. मिरची मुळे लिंबाला कोणी हात सुधा लावू शकत नाही. ( स्कूटर ला लावलेल्या लिंबुमिर्चीमधल लिंबू काढून कोणी सरबत केलाय काय? ) असो.

तुमच्या प्रपंचाच्या तोरणावर हे शुभेच्छांच लिंबू मिर्ची कायम राहो. त्याला कधी दृष्ट न लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!!