मंगळवार 11 डिसेंबर 2018

भगवद्गीता आणि लग्न !! दोघांचे वाढदिवस

आज मोक्षदा एकादशी, मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. भगवदगीतेचा जन्म आज झाला. आज तिचा वाढदिवस. आजच माझ्या लग्नाचासुधा वाढदिवस. गीतेचा उपदेश अंगी बाणण्यासाठी लग्नासारखी दुसरी घटना नाही. गीता काय म्हणते आणि लग्न काय काय करवून घेते ते एकदा बघाच. आपण अगदी अध्याया प्रमाणे जाऊ या.

नातेवाईक सगे सोयरे यांच्या समोर हात पाय गाळुन बसू नकोस.....

( नवरा म्हणून ) कर्म करत राहा, फळाची अपेक्षा मात्र करू नकोस......

( बायकोबरोबर मौल मधे फिरताना) स्थित प्रद्न्याचि लक्षणे विसरू नकोस......

देह वाढला पोट सुटलं तरी घाबरू नकोस, आतला आत्मा अविनाशी आहे.....

कर्म, अकर्म, विकर्म........जे "कर्म" केलं आहेस ते चक्क नाही म्हणून सांग.....

जे विसरलायस ते केलं म्हणून सांग....

नवर्याचा स्वधर्म सोडू नकोस..........

(बायकोला) विश्वरूप दर्शन घडवाव लागेल अशी वेळ आणू नकोस... तू बघू शकणार नाहीस....

मे महिना ( लग्नाचा सिझन) दिवाळी , डिसेंबर या वेळी तात्पुरता सन्यास पत्कर, तरच खर्चाला आळा बसेल....

योग्य वेळी बायको समोर शरण व समर्पण , यातच तुझ भलं आहे. ( योग्य वेळ कळली तर!!)....

सगुण बायकोच्या मागे निर्गुण माहेर आहे हे कायम लक्षात ठेवून जोक कर.....

क्षेत्र म्हणजे तुमचा संसार , क्षेत्रद्य्न (जाणणारी) तीच. हे लक्षात ठेव ( त्यात तू कुठे आहेस हे भगवन्तालाही कळले नाहीए)

सत्वगुण रजोगुण तमोगुण यावर तुझी पी एच डि लग्नाच्या जुबीली पर्यंत होईलच.....

दैवी आणि आसुरी वृत्तींचा झगडा, मनात नव्हे पण संसारात कायम चालू राहील, मित्रांच्या लेटनाइट पार्ट्या विरुद्ध बायको अशा रूपात तो अवतरेल.......

पाण्यात सोडलेल्या कागदाच्या बोटी प्रमाणे नुसताच डुलत राहिलास तर भवसागर सुधा तरुन जाशील. गोल्डन जुबीली करशील. ( हात पाय मारलेस की बुडलास !!)........याला म्हणतात योगी पुरुषाची शेवटची अक्रियावस्था..... शेवटचा १८ वा अध्याय संपला.... . शुभम भवतू !!

“मी तुझे निमुटपणे ऐकतो” असे अर्जुन म्हणाला त्याक्षणी गीता समाप्त झाली. "शुभ मंगल सावधान " च्या क्षणाला हे ज्या नवर्याना उमजलं ते गीता “वागणारे”, बाकी तुम्ही आम्ही नुसतेच वाचणारे...........