मंगळवार 11 डिसेंबर 2018

नवरा- सन्यासी की योगी ?

फार वर्षापुर्वी पुण्याची मन्डईतल्या सार्वजनिक गणपतीची मूर्ती लोडाला टेकून झोपलेल्या बाप्पाची होती. तेव्हापासून समस्त आळशी नव-याना मन्डईतला गणपती अस सीक्रेट नाव पुण्यातल्या बायकानी ठेवल. त्याकाळी व्हाट्सऐप नसून सुधा दुरध्वनीने अखिल महाराष्ट्रात पोहोचल. आमच्या घरात ते अस्पष्टपणे पुट्पुट्ल जात असा मला संशय आहे. (चोराच्या मनात चांदणं ) समस्त नवर्यान्च्या वतीने बाजू माण्ड्ण्यासाठी मला गीतेचा आधार घ्यावा लागला. गीते मध्ये पाचव्या अध्यायात कर्म योग आणि कर्म सन्यास यावर चर्चा आहे. एक, कर्म करूनही न केल्यासारखं वाटणं. दुसरं, स्वता: कर्म न करता सुद्धा सर्व होणं. सोप्प करुन सांगतो म्हणजे लक्षात येईल. नवरा बायको हे पोळ्पाट लाटण्या सारखे असतात. प्रपंच म्हणजे दोघांमधली पोळी. पोळी लाटताना लाटण ( बायको) गरागरा फिरत असते हे आपण बघतो. तिला क्रेडिट देतो.प्रपन्चाच्या पोळीला आकार तिच्यामुळेच येतो. पण त्या पोळीला आधार देण्याच काम पोळपाट करतं. म्हणून पोळी लाटली जाते. आकार आणि आधार . ( बायकानो, किचनच्या ओट्यावर लाटा बर पोळी?) म्हणजे बायको कर्म योगी तर नवरा कर्म सन्यासी. न करून सुद्द्धा काम पूर्ण होऊ देणारा. संसाराच्या बोटीला वल्ह मारणारी बायको तर काहीही न करता बोटिला पुढे जाऊ देणारं पाणी म्हणजे नवरा. अकर्ता, करून न करणारा. पाण्याशिवाय बोट चालवा बरं. महाभारतातल्या गीतेला हे पटलय, (आळशीपणावरुन) महाभारत घडवणार्या घरच्या सीतेला हे केव्हा पटेल?

नवरे आळशी नाहीत. त्यान्च्याकडे अध्यात्मिक दृष्टीने पहा. हा संदेश मी राष्ट्राला या प्रसन्गी देऊ इच्छीतो.

बापरे, कलियुगात आळशी नव-याना काय काय करावं लागतय? जळला मेला पुरुषांचा जन्म!!!