मंगळवार 11 डिसेंबर 2018

कर्मयोग - बाबू वडेवाला

पार्ले टिळकच्या बाबू वडेवाल्याकडे साक्षात श्रीकृष्ण येतात आणि.............

बाबु तुझे वडे, होती "श्रीमन्त", साक्षात भगवन्त || उभे दारी

बाबु आधुनिक, जणु पुन्डलिक, म्हणे देवा माझे ऐक || थाम्ब जरा

होई मधली सुटी, मुले सानमोठी ,बटाटवड्याभेटी || होती गोळा

चिमुकले हात, स्वर्ग त्या वड्यात, बाबुच्या डोळ्यात || मोक्ष प्राप्ती

पोटी असे भुक, वड्याचे ते सुख, माधवाचे मुख,|| तेजाळले.

खुश होई श्रीरन्ग, मन चटणीत दन्ग, घडे जिवा शिवा सन्ग || वडयातून

बाबु म्हणे देवा, उपदेश व्हावा, सत्सन्ग घडावा || उभ्या उभ्या

स्थितप्रद्न्य हासे, सन्तोष विलासे,सुर्य चंद्र दिसे || एकावेळी

कसे तू राखीले, तिखट वडयात, चाळीस वर्षात || मुलांसाठी

कर्मयोग हाच, विवेकाची आच, न कळे खोच || संतानाही

लाखो माझे भक्त, गीता वाचणारे, पण गीता "वागणारे" || त्यांचा मी भक्त