मंगळवार 07 मे 2019

होय, आहे मी "चावीनिष्ठ" !!

बायकोशी तावातावाने भांडताना शेजारची शरयू (नाव काल्पनिक) चोरून ऐकत होती. मी “चावीनिष्ठ” असल्याचं कॉलनीत सांगत होती. अस माझ्या कानावर आलं . तारुण्यात फार पूर्वी पदार्पण करूनही अजून पर्यंत प्रेम न जुळल्यामुळे ,सगळे पुरुष एकजात "तसेच" असतात असं तिचं कडवं मत आहे .

तिला चोख उत्तर म्हणून ही कविता.....

होय ! आहे मी चावी निष्ठ !!

मी आहे कुलूप ,बायको आहे चावी

मी म्हणतो आजच्या काळात जोडी अशीच हवी

होय, मला लागतो गरम गरम फुलका थेट ताटात

मैत्रिणी तिच्या आल्यावर मी चहा देतो तिच्या हातात

गजरा,नाटक ,पाडवा साडी , दरवर्षी "केसरी"

बायकोला "मी" ठेवतो , सदा आनंदी अन हसरी

मासिकातल्या नटयांनाही मी मारत नाही डोळा

"पोचलेला " असेन मी, पण ” त्या” बाबतीत भोळा

भले तुम्ही म्हणा मला गर्विष्ठ अन चावी निष्ठ

"मी" मात्र एक लग्नी, एक पत्नी, एक निष्ठ

शरयू : अहो पण काका ,ते "चावीनिष्ठ" नाहीय्यै, ते आहे मेल शौविनिस्ट ,

थँक यु ,कॉलनीत सांगायला

तुम्ही दिलीत नवीन गोष्ट !!