बुधवार 05 डिसेंबर 2018

होय मीच तो पदर.....

होय मीच तो पदर

बाळाला आडोसा देणारा

देवापुढे पसरणारा

ओट्याजवळ मळणारा

हुश्श घाम टिपणारा

मुलाना पाठीशी घालणारा

सवाष्णींचे दान घेणारा

देवळात पाठ झाकणारा

विकलेल्या दागिन्याचे पैसे लपवणारा

हुन्ड्यासाठी स्टोववर पेटणारा

पदर....................................

आणि तुम्ही सगळ क्रेडीट मात्र “तिला” देता!!

 

मी सुध्धा एक पदर

मी एक पदर, “तशा” बाईचा

भरजरी गर्भरेशमी सुळसुळीत

दिवसभर पहुड्लेला असतो, तिच्या खान्द्यावर

सुस्तावलेल्या अजगरासारखा

पण सुर्य ढ्ळला कि होते पन्चाईत

कारण तो ढळतो एकदाच…….

मी मात्र ढ्ळता ढ्ळता थकुन जातो