बुधवार 05 डिसेंबर 2018

पहिला दिवस घटस्थापनेचा

घट हे संसाराचं प्रतीक. मातीचा घडा , तांदूळ ,हळद, आंब्याची पाने , फुलं या गोष्टींनी स्त्रीची संसाराला सुरुवात होते . दुर्गेची नऊ रूपं बघूया आणि त्यातून धडे घेऊ या .
सती - दक्ष प्रजापतीच्या कन्या सती आपला महाल ऐश्वर्य सोडून शिवाची आराधना करते . त्याला जिंकून घेते . इथे दक्ष यज्ञ करतो . शिवाला सोडून सगळ्या देवांना आमंत्रण देतो वर आलेल्या मुलीचा सतीचा अपमान करतो . हे सहन न होऊन सती आत्मदहन करून घेते .  पती वरच्या निष्ठेची उच्च कसोटी पार करते. संसारासाठी आवश्यक असलेला स्त्रीसाठी हा पहिला धडा .
ब्रह्मचारिणी - शिवासाठी ५००० वर्ष कठोर तप करणारी पार्वती शेवटी फक्त पानावर राहते आणि मग ते सुद्धा सोडते म्हणून अपर्णा .
 .तारकासुराचा वध  करण्यासाठी देवांना शिव पुत्रच हवाय त्यासाठी शिव  पार्वतीचं मिलन आवश्यक . दक्ष प्रजापतीच्या एक मुलगी सती ( पार्वती ) तर दुसरी रती कामदेवाची पत्नी .कामदेवाने  सोडलेला मदन बाण शिव तिसरा डोळा उघडून कामदेवासकट भस्म  करतो  . पार्वती शिवाला तपश्चर्येने प्रसन्न करून घेते . सती ( या जन्मात पार्वती ) जिंकते , रती ( काम पत्नी )  हरते . म्हणजे सच्च्या प्रेमानेच पतीला जिंकून घेता येतं . नुसत्याच काम पूर्तीने नव्हे. हा आजचा धडा .
चंद्रघंटा, चामुंडा, चंडिका - पार्वतीच्या घरी स्मशानात राहणारा शिव आपल्या गळ्यात नाग ,मुंडकी घालून भस्म फासून , अघोरी , भूतं , बैरागी याना घेऊन येतो . पार्वतीची आई बेशुद्धच पडते . पार्वती मग त्याला शोभण्यासाठी चामुंडेचं रूप धारण करते .
काळ रात्री- काली  , महाकाली . रात्रीवर अधिराज्य असणारी उग्र देवी . कुटुम्ब , व्यक्ती , समाज  या रूपात येणारी स्त्रीवरची संकटं आपण पाहिली . आता आयुष्यात येणारी भयानक संकट पाहू . उदा . वैधव्य, महापूर , भूकंप . हि  संकटं म्हणजे आयुष्याची काळरात्र . हाती तलवार , त्रिशूल , ज्वाला , गदा , फासाची दोरी घेऊन हि देवी सुचवते कि सगळी शस्त्र वापरा. खेचर हे हिचं वाहन . घोडा म्हणजे शक्ती , खेचर म्हणजे सहनशक्ती . या काळात सहनशक्ती आणि सर्व अस्त्र वापरण्याची गरज असते . उग्र स्वरूप धारण करा उग्र म्हणजे रागीट नव्हे उग्र म्हणजे अग्रेसिव्ह व्हा . सर्व शक्ती पणाला लावा.पण सहन शक्ती ठेवा .
आज सातवा दिवस , हा धडा
महागौरी - कालीच्या  अगदी विरुद्ध शुभ्र , श्वेत , रूपवान असं गौरीचं रूप म्हणजे महागौरी . वरची उग्र रूप धारण करून देवी काळी पडली . अस म्हणतात कि ब्राह्मणाच्या सांगण्या वरून  तिने मानस सरोवरात आंघोळ केली तिची काळी त्वचा गळून पडली . ती पुन्हा गौरांगना  झाली . काही म्हणतात शिवाने गंगाजलाने तिला न्हाऊ घातली . आयुष्यात कितीही युद्ध झाली तर स्त्री ने पुन्हा तिच्या मूळ पवित्र , सुंदर, मंगल रूपात यावं हाच आजचा धडा.

सिद्धी दात्री - अष्ट सिद्धी प्राप्त झालेली देवी . अर्ध नारी नटेश्वर हे रूप प्रदान  करणारी देवी. प्रत्येक स्त्री मध्ये एक खंबीर पुरुष  वास करून असतो. म्हणजे पुरुषाचे गुण तिच्यात असतात . उदा. झाशीची राणी . त्या दोघांचा योग्य जुळून आला तर स्त्रीला अनेक सिद्धी प्राप्त करून घेता येतात म्हणजे ती हवे ते  मिळवू शकते हा आजच्या शेवटच्या दिवसाचा धडा .