मंगळवार 11 डिसेंबर 2018

भात

तांदुळावर भावनिक लेख लिहिला तो आवडला म्हणून आता त्याच तांदळावर शास्त्रीय लेख लिहितो आहे . 

पॉलिशड सफेद भात आपण खातो तो आरोग्याला अपायकारक आहे .शक्यतो फायबर असलेला ब्राउन भात खावा .  त्यात सफेद भात  वाळून न करता कुकर मध्ये शिजवला असेल तर नक्कीच अपायकारक आहे . कुकर वाले काही समज करोत पण आयुर्वेदात भात करण्याची पद्धत वाळून आहे . भातातले  स्टार्च त्यामुळे  जाते. तांदळातला कफ जातो असे म्हणतात . वाळलेला भात सांधेदुखी आणि बद्ध कोष्ठ या करता उत्तम . आयुर्वेदात हे वाळून टाकलेले पाणी अर्धे घरातल्या पाळीव प्राणी व झाडे याना घालावे (  त्यांना स्टार्च व बी व्हिटॅमिन लागते ) व अर्धे थोडे ताक व मेथ्या दाणे टाकून झाकून ठेवावे व दुसर्या दिवशीच्या भाताला वापरावे असे सांगितले आहे. ताका मध्ये लॅक्टोबॅसिलस, प्रोबियॉटिक ,पचन व  आतड्यांचे आरोग्य यासाठी उपयोगी  आणि  मेथ्या मुळे इन्सुलिनचे कार्य सुरळीत होते. भात खाऊन जास्त इन्सुलिन बाहेर पडत नाही साखर खूप वाढत नाही किंवा अचानक कमी होऊन पुन्हा भूक लागणे किंवा झोप येणे , जांभया येणे असे होत नाही . असा भात नेहेमी खाऊन सुद्धा  डायबिटीस होत नाही.  चणे , छोले  राजमा , धान्ये, डाळी  भातात मिक्स केली असल्यास मधुमेहापासून खूप अंतर  राखता येते. 

आयुर्वेदाला पाचवा वेद म्हणतात ते उगाच नाही.