गुरुवार 13 डिसेंबर 2018

खेळ

खेळ ! खोटा खोटा की खरा खरा ?
आजोबा: बबडे बबडे ,आता घरी चल बघू
आई किती ओरडतेय तिला काय सांगू?
बबडी: अजुन वेळ आहे ना आजोबा
रात्र कुठे झालीय, थोड तरी थांबा
हेच माझ आता घर आहे
इथेच मी नेहेमी राहणार आहे
मला तिथे का बोलावता
इथेच या राहायला आता
घर माझ छान छत्रीखाली
त्यात भावल्या,खेळणी, भातुकली
आजोबा: वेडी आहेस का बबडे, दिसतेस् आज खुशीत
पण खर घर जे, तिथे आई घेते कुशीत
कस समजावू तुला? आई म्हणते घेऊन या
चल मी झोपतो,तू आणि आई बघून घ्या
सीन २ ; आजोबांच्या स्वप्नात
यम :आजोबा आपल्या घरी चला बघू,माउली बोलावतेय
वेळ संपली म्हणाव, घेऊन या म्हणतेय
आजोबा: थांब ना थोडा ,बाबा, अजुन रात्र कुठे झाली?
मुलगा सून कमवतायत, अंन बबडी आहे बाहुली
यम: आजोबा वेडे आहात का तुम्ही ? हा सारा खोटा खेळ
चला बघू लवकर, घालवू नका माझा वेळ
ही सगळी भातुकली, किवा नुसती खेळणी
आपल घर देवाघरी, ही तात्पुरती मान्डणी
पुन्हा यायचेय आपण इथे परत खेळायला
नव्या शरीरात, नव्या घरात काही वर्ष राहायला
शहाणे ना तुम्ही आजोबा, अशा हट्ट नायी कलायचा !
आयुष्याचा दोर असा घट्ट नाई धलायचा !
सीन ३ - आजोबाना उठवत
बबडी: आजोबा आजोबा कोणाशी बोलताय
खेळू द्या , खेळु द्या कोणाला म्हणताय
मला पण येऊ द्या ना तुमच्या सोबत
त्रास नाही देणार मी बाहुली शपथ
आजोबा: चूप बबडे, अभद्र नको बोलू
जा अंगणात अंन खेळ ठेव चालू
पण एक लक्षात ठेव, बबडे
सम्पली जर का खेळण्याची वेळ
तर सोडावा लागतो अर्ध्यावर खेळ…………………