सोमवार 10 डिसेंबर 2018

शेक्सपियरच्या ४०० व्या जयंती च्या निमित्ताने हॅम्लेट आणि अर्जुन !!

अहो, शेक्सपियर, तुमचा हॅमलेट पूर्वी अर्जुन म्हणून जन्माला आला होता हे माहितेय का ? त्याच्या बापाचा वध करणारा क्लॉडियस तेव्हा दुर्योधन होता. निष्ठुर

क्लॉडियसला जसा पश्चात्ताप होतो आणि तो चर्च मध्ये कबूल करतो तसा दुर्योधनालाही झाला होता. तो श्रीकृष्णाला म्हणतो, जानामि धर्म न च मे प्रव्रुत्ती, जानामिधर्म न च मे निव्रुत्ती, केनेपी देवेन हृदये स्ठितेन, सा नियुक्तोस्मि तथा करोमी, म्हणजे मी धर्म जाणतो पण करवत नाही, अधर्म जाणतो पण राहावत नाही, कोणी तरी माझ्या हृदयात बसून हे सगळे करून घेतय.

प्रार्थना करणार्या क्लॉ डियस ला मी कसा मारू? असा प्रश्न हॅमलेट ला पडला. तसाच रथचक्र उद्धरू दे अस विनवणार्या कर्णा ला मी कसा मारू ? असा अर्जुनालाहि पडला. पण तेव्हा कुठे गेला होता राधासूता तुझा धर्म ? अस ठणकावुन विचारणारा क्रुष्ण त्याच्याकडे होता

मारावे की मरावे ? टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न दोघांना पडला होता पण हॅमलेट पडला बिचारा एकटा. अर्जूनावर भगवन्ताचा हात होता.

हॅमलेट वर जिवापाड प्रेम करणारी ओफेलिया त्याच्या टू बी ऑर नॉट टू बी वागण्या मुळे हातातून गेली , तिथे अर्जुनाची द्रौपदी होती, ऐनवेळी श्री क्रुष्ण धावून आला नसता तर ती सुद्धा अशीच..........

श्री कृष्णा सारखा तुम्ही हॅमलेट ला जीवभावाचा मित्र होराशियो दिलात, जो हॅमलेट साठी विशाचा प्याला प्यायला निघाला होता. न् धरी शस्त्र करी म्हणणारा क्रुष्ण सुद्धा शेवटी न राहवून भीष्माच्या अंगावर धावून गेला होता.

मानवी मनाचे इतके बारीक कंगोरे व्यासांनंतर तुम्हीच समर्थ पणे रेखाटलेत. नीती अनितीच्या कल्पना माणसाला अशा काही जखडून टाकतात की युधात शत्रू समोर असतानाही तो निर्णय घेऊ शकत नाही. परिस्थिती, नाती, निसर्ग यांच्याबरोबर लढताना माणुस नेहेमीच हरत आलाय तो याचमुळे. म्हणूनच त्याला यातून बाहेर पडण्यासाठी देवाचा आशीर्वाद लागतो.

लहान तोंडी मोठा घास घेतोय, मी पामर काय बोलणार ?पण त्या वेळी तुम्हाला

श्रीकृष्ण सूचायला हवा होता. हॅमलेट ची शोकांतिका होण्या ऐवजी महाभारतासारख एक महान तत्वद्न्यान घडल असत.