सोमवार 10 डिसेंबर 2018

हाय मराठी ! हे ग काय मराठी ?

ए टू झेड सगळ्या आद्या क्षरांची मराठी टिवि चॅनेल्स आली. पण मराठी माणसाच्या आयुष्यात काही फरक पडला नाही. एकदा मी असाच कामावरून येऊन रिमोट गरा गरा फिरवत चांगला प्रोग्राम शोधत होतो. ( वेडी आशा, दुसर काय?) तशीच झोप लागली, स्वप्नात ही चॅनेल्स एकत्र आली, फेर धरून नाचू लागली, ही कविता करून गेली.

नेता आणि बिल्डर : ( अंगावर खेकसत ) ए मराठी !!!!

( घIबरेघुबरे होऊन) जी मराठी ?

( नोटा फेकून ) घे मराठी !!

( गोळा करत ) दे मराठी .......

नेता : मत देतोस का हाणू काठी ?

बिल्डर : माझाच सातबारा , माझाच तलाठी !!

सन्ध्याकाळी बागेत : तो : ( डोळ्यात बघत) ये मराठी ,

ती : ( मान फिरवत ) छे मराठी !

तो: ( समजावत ) तू मराठी , ( आवाज चढवत) मी मराठी, तरी का तुझ्या बाबांची आडकाठी ?

हायफाय क्लब मधे : पहिली : ई मराठी !!!

दुसरी : शी मराठी !!!

पहिली : अशी काय ग ही मराठी ?

दुसरी : सो डाउन मार्केट अँड घाटी !!

कॉलेज कट्ट्यावर : तो , ती , ते : हाय मराठी,

कूल मराठी,

चिल मराठी,

लोल मराठी,

द्यानेश्वरांची मराठी : हुश्श, फाइनली मी आता तरुणांच्या ओठी !!