गुरुवार 06 डिसेंबर 2018

दूध दही लस्सी - आयुष्य

प्रिय ए , जग आपल्या मनाप्रमाणे कधीच वागत नाही . दुनिया ही  मिठाच्या पाण्यासारखी असते. इथे काहीच गोड़ गोड़ नसतं . सगळंच खारट . आपल्या मनासारखं काही होत नाही . आपण सगळे दुधासारखे  शुद्ध, स्वच्छ आणि ज्ञानी असलो तरी  त्या मिठाच्या पाण्याशी एकरूप होत नाही. उलट दुध फाटतं . कारण त्या दुधात ज्ञानाचं सत्व आणि अहंकाराचं / अभिमानाचं  पाणी एकत्र असतं. ते वेगळं करणं कठीण.आपल्या मनासारखं व्हायलाच हवं म्हणजे काम , झालं नाही कि क्रोध . अभिमानाची ही  दोन जुळी मुलं . ज्ञानेश्वर म्हणतात "ते चैतन्याचे शेजारी , वसती बुद्धीच्या हारी" , काम क्रोध मोठे हुशार असतात , आत्म्याच्या शेजारी , सद्सद्विवेकबुद्धीच्या पंक्तीला जेवायला बसतात . त्यांना उठवायला आपल्यालाच लाज वाटते .  मग आपल्या व्यक्तिमत्वाला  विरजण लावायचं. म्हणजे काय करायचं ? तर स्वतःच्या अहं कडे दुसर्याच्या नजरेने बघायचं . आपल्या मनाप्रमाणेच जग प्रतिसाद देईल ? नाही . याचा स्वीकार करायचा . अहंकाराचं/ काम क्रोधाचं  पाणी वेगळं करायचं. शुद्ध सत्व दही आता मिठाच्या पाण्यात छान एकजीव होऊन जातं , मस्त लस्सी बनते . जे दुधाला जमलं नाही  ते अभिमान रहीत दह्याला जमतं.

 

0 अभिप्राय :
Post Your Comment