शुक्रवार 07 डिसेंबर 2018

क्रोध आणि राग, बाजीराव मस्तानी !!

क्रोध म्हणजे काय हे आधी आपण समजून घेउया. क्रोध म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली एक अनोखी देणगी आहे. आपल्या अंगातली सारी ताकद एकवटल्यावर आपल्या अंगात जे बळ येत ते म्हणजे क्रोध.त्यामुळे शरीर व मन एकाच बिन्दूवर केन्द्रीत होऊन शक्ति वापरतात म्हणून ती अनेक पट परिणाम करू शकते. उदाहरण म्हणून सांगतो, जोर लगाके .......अस ओरडल्यावर हैय्या म्हणत मजूर जड लोखंडी रुळ उचलतात.

अनोळख्या गल्लीतला कुत्रा मागे लागला की आपण जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. शेवटच्या बॉल वर एखादा धोणी किवा मियांदाद सिक्स मारुन मॅच फिरवतो. गणपती बाप्पा........? शिवाजी महाराज की.......?अशी साद दिल्यावर मराठी माणूस बेंबीच्या देठापासून मोरया किंवा जय असा प्रतिसाद देतो. एखादा बॉडीबिल्डर किंवा कुन्ग्फू वाला ब्रूस ली अशी ताकद एकवटू शकतो म्हणून परिणाम साधतो. हा सगळा क्रोध आणि ताकद एकत्र आल्याचा परीणाम असतो.

मन्द्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे, या मारुती स्तोत्रात क्रोध होता म्हणूनच मारुती रायानी अख्खा डोंगर उचलला. आपण क्रोध म्हणजे राग समजत होतो कारण ऋषिंचा क्रोधाग्नी भडकला आणि त्यानी शाप दिला. अस आपण लहानपणी वाचलय. रागाला बळ देण्याच काम सुधा क्रोध करतो हे खर आहे पण फक्त तेच नाही. आता खरी गंमत पुढेच आहे.

हा क्रोध किंवा एकवटलेले बळ बाजीराव असतो. याच्या जिवावर आपल शरीर आणि मन दैनंदिन जीवनातल्या सगळ्या लढाया लढत असत. क्रोध अधिक ताकद म्हणजे अनेक पटीनी वाढलेली शक्ती. बाजीरावासारखा क्रोध सुधा

लढाया जिंकून अजिंक्य राहतो. त्यात बाजीरावाला साथ मिळते ती ताकदीची म्हणजेच काशिबाईची.

पण हाय, दैवाला हे बघवत नाही. एके दिवशी क्रोध लढायला गेला असता त्याला राग नावाची मस्तानी भेटते. दोघांचा स्वभाव सारखा, आवेश सारखा म्हणून स्वभाव जुळतो. मन जुळत. दोघ प्रेमात पडतात, आकन्ठ बुडतात.

मस्तानी उर्फ राग फ़क्त सुंदर दिसते पण त्यात काशीबाई सारखी ताकद नसते. क्रोध मग चिडचिड करतो. राग राग करतो. धुसफूस करतो, मनस्ताप करून घेतो पण त्याच्या हातून काहीच घडत नाही. राग फ़क्त मनात

राहतो, ताकद शरीरात राहते. उलट क्रोध रागाबरोबर गेला की परिणाम शरीरावर ( काशीबाई) होतो. ब्लड प्रेशर, असिडिटी, चिंता, नीद्रानाश, कामावर, नात्यावर वाईट परिणाम हे सगळे रागाचे प्रताप.

बाजीरावाला कितीही समजवल तरी तो ऐकत नाही, मस्तानीला सोडत नाही. त्याच्या कर्तुत्वाला ग्रहण लागत्. मनासोबत शरीर सुद्धा उद्ध्वस्त होत,

उरते ती फक्त एक फसलेली प्रेमकहाणी !!

म्हणून बुन्देल्खन्डाच्या छत्रसाल ( अहंकार) राजाची रुपवान कन्या मस्तानी ( राग) हिला वेळीच दूर ठेवा. बाजीरावाचा ( क्रोधाचा) सकारात्मक वापर करा.

( काशीबाई) ताकदीबरोबर त्याला सुखाने संसार करू द्या.

इतिहासाची पुनराव्रुत्ती नको. !!

0 अभिप्राय :
Post Your Comment